इतर

डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ. शिवाजी काळे यांना साहित्य ज्योती पुरस्कार घोषित

श्रीरामपूर-येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘फिरत्या चाकावरती ‘आणि साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांच्या ‘गाकुसातल्या गोष्टी ‘या पुस्तकांना बीड जिल्ह्यातील कडा येथील साहित्य ज्योती काव्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाले असल्याची माहिती मंच संस्थापक, अध्यक्ष प्रा.नागेश शेलार यांनी दिली.
डॉ.बाबुराव उपाध्ये 30जून 2017रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.त्यांनी सातारा, पुणे, कर्जत, श्रीरामपूर शाखेत 33वर्षे अध्यापन केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17विद्यार्थी एम. फिल.,08विद्यार्थी पीएच. डी. झाले. डॉ. उपाध्ये यांची विविध वाड्मय प्रकारात 44पुस्तके प्रकाशित आहेत, त्यांना सामाजिक, शैक्षणिक, वाड्मयीन कार्याबद्दल 61पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अहमदनगर जिल्ह्यात ते 1978पासून साहित्यविश्वात कार्यरत आहेत. डॉ. शिवाजी एकनाथ काळे हे नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील शेतकरी पूत्र असून ते 1981पासून साहित्यक्षेत्रात योगदान देत आहेत.त्यांनी संत ज्ञानदेवादी भावंडांच्या साहित्यसेवेवर पीएच. डी. संशोधन केले.ध्यासपर्व आत्मचरित्रावर एम. फिल. केले,ते नेट, सेट उत्तीर्ण आहेत. एक प्रभावी गझलकार, ग्रामीण कथाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.मुळा प्रवरा वीज संस्थेत ते अभियंता होते. 2011पासून ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ऐतवडे बुद्रुक येथून त्यांची बदली राहाता येथील शाखेत झाली आहे.त्यांच्या ‘गावकुसातल्या गोष्टी ‘या विनोदी ग्रामीण कथासंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, आसरा प्रकाशन द्वारे त्यांनी अनेकांची पुस्तके ना नफा ना तोटा या सेवाभावाने प्रकाशित केली आहेत. डॉ. उपाध्ये, डॉ. काळे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button