विज्ञानाबरोबर अध्यात्मिक ज्ञानही आत्मसात करावे : काशिनाथ दाते सर

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
दरोडी ता. पारनेर येथील चारंगेश्वर दैवताचा उत्सव सोहळ्याच्या सप्ताह निमित्त जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले प्रमुख उपस्थितीत होते. कै. बबनराव पावडे यांचे प्रेरणेने, रमेश महाराज पावडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने व भुजंगवाडी समस्त ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १९ वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे. महाप्रसादाचे अन्नदाते ज्ञानदेव बांगर, मारुती पावडे, अर्जुन पावडे, राजू पावडे, बाबाजी बेलोटे, निर्मला गागरे हे होते.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते म्हणाले आजच्या समाजामध्ये तरुणांनी आध्यात्मिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. अध्यात्माने समाज प्रबोधन होते समाजामध्ये आज प्रबोधनाची गरज आहे.
तरुण पिढीने नको त्या प्रभोलनाला बळी न पडता योग्य विचार करावा. आपल्या वडिलधाऱ्यांच्या मान सन्मानाला बाधा येईल असे कृत्य आपल्याकडून होऊ नये. आपले दैनंदिन काम करत असताना अध्यात्माने मानवी मनाला शांती मिळते. विज्ञान, अध्यात्म आणि समाज सर्वांना बरोबर घेऊन भेदभाव न ठेवता काम केले पाहिजे. तुम्ही आम्हाला दर वर्षी न विसरता बोलवता आम्हालाही येण्याचे भाग्य मिळते तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो यावेळी प्रेमानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले होते.
यावेळी माजी सरपंच सुमन पावडे, अनिल पावडे, सरपंच जयश्री चौगुले, शिवाजी पावडे, दादाभाऊ कड, राजेंद्र पावडे, नामदेव भोसले, विष्णू भोसले,अध्यक्ष रामदास पावडे, संजय पावडे, नामदेव भोसले, भाऊसाहेब पावडे शिवाजी पावडे, नारायण पावडे, संतोष पावडे, प्रवीण पावडे, संग्राम पावडे, रविंद्र पावडे इ. मान्यवर उपस्थितीत होते.