इतर

धर्म रक्षणासाठी समर्पित जीवन असावे लागते – स्वामी प्रकाशानंदगिरीजी


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


संतांचे अंतकरण हे विशाल असल्यामुळेच त्यांच्याकडे दया असते.संतांच्या चरण सेवेत भगवंताची प्राप्ती होत असल्यामुळे संतांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला पाहिजे, अशा जीवन समर्पित करणाऱ्या संतांकडूनच धर्मरक्षणाचे महान कार्य घडत असते. असे मत देवगड संस्थांचे उत्तर अधिकारी महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे नवनाथ बाबाच्या सभागृहा समोरील प्रांगणात आयोजित ५५ व्या अखंड हरिनाम सप्ताहच्या कीर्तनरुपी पुष्पगुंफतांना महाराज बोलत होते.

नवनाथ हेही संत परंपरेतीलच असून त्यांचेही कार्य महान आहे. नवनाथाचे पौराणिक संदर्भ देऊन नाथ सांप्रदायाची महती विषद केली.विविध विद्येच्या बळावर नाथांनी जगभरात ज्ञान व भक्तीचा प्रसार व प्रचार केला आहे. धर्म रक्षणाचे केलेले महान कार्य आपणास पहावयास मिळते.यावेळी गहिनीनाथ महाराज आढाव, हरिभाऊ महाराज अकोलकर, विष्णु महाराज दुकळे, अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे,भायगाव ग्रामपंचायतचे सरपंच युवा नेते राजेंद्र आढाव, भायगाव सेवा संस्थेचे माजी चेअरमन अँड. लक्ष्मणराव लांडे, जनार्धन लांडे,हरिचंद्र आढाव, गणपत आढाव, शेषेराव दुकळे, अँड. सागर चव्हाण, राजेंद्र म्हसु दुकळे, संतोष आढाव, बाळासाहेब दुकळे, हरिचंद्र चव्हाण, विठ्ठल आढाव,सदाशिव शेकडे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, सर्जेराव दुकळे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान आढाव, आण्णासाहेब दुकळे, अशोक दुकळे, शिवाजी लांडे, डॉ. रघुनाथ आढाव, बापुराव दुकळे, नारायण आढाव, डॉ.विजय खेडकर, धोंडिराम ढोरकुले, ज्ञानदेव नेव्हल,सुदाम खंडागळे, पांडुरंग आढाव,अशोक उभेदळ, अनिल लांडे, रोहित खाटिक, अमोल आढाव, कडुबाळ सौदागर, पत्रकार शहाराम आगळे, सप्ताह कमिटीचे कैलास लांडे आदिनाथ लांडे यांच्यासह भायगाव व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

श्री क्षेत्र देवगड संस्थान कडून कौतुक

वै.पांडुरंग महाराज वैद्य,बन्सी महाराज तांबे, यांच्या शुभहस्ते सुरू झालेल्या या सप्ताहची पायाभरणी वै.नामदेव पाटील लांडे यांनी केली. नंतरच्या काळात वै.रामदास महाराज लोंढे यांचेही योगदान मिळाले. याच काळात देवगड संस्थांनचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने गहिनीनाथ महाराज आढाव हरिभाऊ महाराज अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या या सप्ताहाचे देवगड संस्थानचे उत्तरअधिकारी महंत प्रकाशनंदगिरी महाराज यांनी कौतुक केले आहे.व गावात काढलेल्या संत पूजन मिरवणुकीचे महाराजांनी अभिमानाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असल्याबाबतच्या उल्लेख करून मिरवणुकीतील कु.स्वरा प्रदिप लांडे कु समृद्धी किशोर महाजन यांनी केलेल्या पारंपारिक वेशभूषेचे तोंड भरून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button