आबासाहेब काकडे शिक्षण समूहातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे प्रेरक होते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण शाळा, समाज, तालुका ,जिल्हा ,देशच नव्हे तर संपूर्ण विश्व घडवूया, त्यांच्या विचारांशी आपण कटिबद्ध राहण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष अॅड. डॉ .विद्याधरजी काकडे साहेब यांनी केले .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आबासाहेब काकडे शिक्षण समूहातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष अॅड. डॉ . विद्याधरजी काकडे साहेब ,जि . प .सदस्या सौ .हर्षदाताई काकडे, आबासाहेब काकडे विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे ,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर,आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य अरुण चोथे, उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, शिवाजी पोटभरे, विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी शेवगाव शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .
अँड. विद्याधरजी काकडे साहेब आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की ,डॉ . बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी न करता संपूर्ण समाजाच्या विकासासाठी केला त्यामुळेच आजतागायत त्यांच्या कीर्तीचा डंका सर्वत्र गाजत आहे . डॉ . बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसारच आज आपल्या संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालत आहे असेही त्यांनी सांगितले .
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. रामदास गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा . जरीना शेख यांनी केले.