कौठवाडीची बिरोबा कठ्याची यात्रा रविवारी

विलास तुपे
राजूर / प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा राजूर उरूस च्या पूर्व संधेला व अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा उत्साह पार पडनार आहे असे संस्थापक अध्यक्ष दत्ता भोईर व सुरेश भांगरे यांनी सांगितले रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच बिरोबा देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून येथे गर्दी केली जाते.गावात श्री बिरोबा देवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी करतात .
कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला ‘कठा’ लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती दत्ता भोईर यांनी दिली. या वर्षी गर्दीचा गर्दीचा ओघ पाहता श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट व कौठवाडी वाडी ग्रामस्थ यात्रा सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे
