धामणगाव पाट येथे विश्वकर्मा जयंती साजरी

भगवान विश्वकर्मा यांचे विचार प्रेरणादायी
– प्रा.दिपक राऊत
कोतुळ प्रतिनिधी
विश्वकर्मा प्रतिष्ठान व जय मल्हार मित्र मंडळ , धामणगाव पाट यांच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोमवार दि १४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
विश्वकर्मा प्रतिमेची गावातून भव्य मिरवणुक झाली. त्यानंतर साई-दीपचे संचालक प्रा.दिपक राऊत यांचे व्याख्यान झाले. विश्वकर्माच्या महती बरोबरच त्यांचे तत्त्वज्ञान व विचार कसे व्यापक आहेत हा दृष्टिकोन मांडत असतानाच आजही त्या विचारांच्या प्रेरणेची सर्व समाजांना गरज असल्याचे प्रतिपादन राऊत सरांनी केले.तसेच जयंतीसाठी सुतार समाजाबरोबरच गावातील इतरही सर्व समाज उपस्थित असल्याने आनंद व्यक्त करतानाच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले.
सरपंच बाळासाहेब भोर , माजी सरपंच अशोक शेळके, पोलीस पाटील एल आर भोर ,भाऊसाहेब वाकचौरे, अरुण सुर्यवंशीआदी मान्यवर उपस्थित होते
बांधकाम व्यावसायिक कैलास मामा राऊत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच के सी राऊत (अबितखिंड) यांच्या सुमधुर वाणीतून भगवान विश्वकर्माची आरती सतीश राऊत यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.नंतर मच्छिंद्र राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले
.शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

सोमनाथ वाकचौरे, गणेश शिरसाट मयूर शिंगवान,सागर राऊत, बाळासाहेब वाकचौरे,नागेश राऊत, आकाश राऊत, ज्ञानेश्वर शिंग, बाळू राऊत, सागर राऊत, शिवाजी राऊत दिलीप राऊत, हर्षल राऊत, स्वप्निल शिरसाठ, आकाश शिंगवान, तेजस शिंगवान, संदीप वाकचौरे,कार्तिक राऊत यासह विश्वकर्मा प्रतिष्ठान व जय मल्हार मित्र मंडळ धामणगाव पाटचे सर्व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.