पळवे खुर्द येथे भैरवनाथ महिला ग्राम संघाचे नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ,पंचायत समिती पारनेर यांच्या अंतर्गत” भैरवनाथ महिला ग्राम संघ पळवे खु. या शाखेचे नूतन कार्यालय उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला

शुक्रवार दिनांक 21 रोजी राणीताई लंके (जिल्हा परिषद सदस्य ) यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सतीश भालेकर सर,श्रद्धा ताई ढोरमले (कृषी कन्या) तोडमल मॅडम (बी एम तालुका व्यवस्थापन कक्ष पारनेर),गांगड मॅडम,पळवे गावचे विद्यमान ग्रामसेवक कविताताई अवधूत मॅडम तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी तसेच पळवे खुर्द गावचे सर्व पदाधिकारी,पळवे खुर्द तसेच पळवे बुद्रुक ,जातेगाव सर्व स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व महिला तसेच सीआरपी मंगल पळसकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला.

त्यावेळी सतीश भालेकर सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यानंतर राणी ताई लंके यांनी विशेष व उत्कृष्ट मार्गदर्शनपर भाषण केले तसेच त्यावेळी श्रद्धा ताई ढोरमले यांनी सेंद्रिय व जैविक शेती तसेच 70 म्हशींचा दुमजली गोठा तसेच बायोगॅस निर्मिती ,गांडूळ खत प्रकल्प यावर विशेष व्याख्यान दिले तसेच तोडमल मॅडम यांनी बचत गटात असलेल्या समस्याचे निराकरण केले व ग्राम संघाचे कार्य व ग्राम संघावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी ग्राम संघांतर्गत येणारे 22 महिला स्वयंसहायता समूहातील सर्व महिला आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या तसेच त्यावेळी V.R.F चेकचे वाटप निमसे सर तसेच तोडमल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भैरवनाथ ग्राम संघ पळवे खुर्द या शाखेची सी आर पी मंगल पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी अध्यक्ष संध्या गाडीलकर, सचिव सविताताई देशमुख, कोषाध्यक्ष प्रमिलाताई गाडीलकर, व लिपिका अर्चनाताई देशमुख हे सर्वजण ग्राम संघाचे काम पाहत आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पळसकर व सीआरपी मंगल पळसकर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले