अहमदनगर

पारनेरच्या तहसिलदारांवर कारवाई साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

दत्ता ठुबे
पारनेर:-पारनेर तालुक्यातील तहसीलदार शिवकुमार यांची पदोन्नती स्थगित करून त्वरित निलंबित करण्यात यावे.याबाबत समस्त शेतरस्ते पीडित शेतकरी पारनेर तालुका यांच्याकडून देण्यात आले. तहसीलदार कार्यालय पारनेर या ठिकाणी दि.24 एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या पेरु वाटप आंदोलनादरम्यान पारनेर तहसीलदार यांनी अयोग्य भाषेचा वापर करून शेतकऱ्यांना दम दाटी करून पेरू फेकून देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. कलम १४४ गुन्हा दाखल करून अटक करु. तहसीलदार यांच्याकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नोटीस मिळाले नाही वेळोवेळी तहसील कार्यालय पारनेर येथे निवेदन दिले आहे व आंदोलनांचा इशारा सुद्धा दिला आहे. तहसीलदार यांनी सर्व कर्मचारी यांना बोलवून व आंदोलनातील पेरू फेकून देऊन शेतकऱ्यांची अवहेलना केल्याप्रकरणी या आधी सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची पदोन्नती स्थगित करून त्वरित निलंबित करण्यात यावे.तहसील मधील घडलेल्या प्रकरनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

समस्त शेती रस्ता पीडीत शेतकऱ्यांची मागणी सप्तपदी अभियानातील प्रलंबित शिवबा शिव रस्त्यांचे अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. पारनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावगावचे पाझर तलाव तातडीने दुरुस्त करण्यात यावेत.सप्तपदी अभियानातील शेतरस्ता शिव पानंदरस्ता अभियानाच्या नावाखाली सर्व सामान्य शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिका-यावर कठोर कारवाई करण्यात यावी.वरील मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास दिनांक 8 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनादरम्यान कोणतेही अनुसूचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,दशरथ वाळूंज, होशिराम कुदळे, भाऊसाहेब वाळूंज, संजय कनिच्छे , रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, पांडुरंग कळमकर, समिर लाळगे, सुर्यकांत सालके, बाळासाहेब औटी, श्रीनिवास शिंदे, बाळसाहेब दळवी, रामदास लोणकर, संपत जाधव, प्रशांत खैरे, शंकर खैरे, सोमनाथ फरांगडे तसेच काही ग्रामस्थांच्या सह्या करून निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button