महावितरण त्या कंत्राटदारावर कारवाई साठी पुणे विभाग कार्यालया समोर उपोषणाचा इशारा

पुणे प्रतिनिधी
वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराला महावितरण चे सातारा जिल्ह्यातील कंत्राट मिळाले असता त्यांनी शेकडो वीज कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा ११०० रुपये प्रमाणे करोडो रुपये परस्पर या कामगारांच्या बँक खात्यातून अनधिकृत पणे इन्शुरन्सच्या नावाखाली काढून घेतले आहेत . ही बाब महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या पदाधिकारी व ०६ कामगारांनी , महावितरण सातारा प्रशासन व सातारा पोलीस यांच्या निदर्शनास आणून दिली असता या संस्थेवर सातारा पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल होऊन सदर कंत्राटदाराला अटक झाली. तक्रार केली या सूडभावनेने व आकसापोटी त्याने 01 जानेवारी 2023 पासून 06 वीज कंत्राटी कामगार अनधिकृतपणे कामावर रुजू करून घेतले नाही .
सदर कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्या बद्दलची सर्व माहिती महावितरण सातारा प्रशासनाला असून सुद्धा पुन्हा त्यांच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याच संस्थेला महावितरण सातारा प्रशासनाने पुन्हा टेंडर देऊ केले. या बाबत संघटनेने प्रशासन व मा.सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सातारा येथेही तक्रार केली असून सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्या ऐवजी याच भ्रष्ट कंत्राटदाराला टेंडर कसे दिले जाते ? हा मोठा प्रश्न आहे.
मा.सहाय्यक कामगार आयुक्त सातारा व अधीक्षक अभियंता सातारा यांनी आदेश देऊनही या 06 अन्याग्रस्त कामगारांना कामावर घेतले जात नाही उलट भ्रष्ट कंत्राटदारालाच महावितरणचे काही प्रशासकीय अधिकारी अभय देताना दिसत आहे सदर कंत्राटदार व दोषी अधिकारी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे ऊप महामंत्री राहूल बोडके यांच्या नेतृत्वाखाली व ईतर पदाधिकारी आमरण उपोषण करणार आहेत.
प्रादेशिक संचालक कार्यालय महावितरण पुणे, प्रकाशभवन सेनापती बापट रोड, गणेशखिंड पुणे येथे मंगळवार दिनांक 9 मे 2023 सकाळी 10 वाजेपासून संघटनचे पदाधिकारी आमरण उपोषणास बसणार आहेत , जो पर्यंत या कामगारांना न्याय मिळतं नाही तो पर्यंत संघर्ष करणार आहेत असा इशारा महाराष्ट् वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे*