अहमदनगर

पारनेर तहसिलदारांवर कारवाई साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

शेतकऱ्यांचे शिव पाणंद , शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावु — जिल्हाधिकारी

दत्ता ठुबे
पारनेर:- पारनेर तहसिलदार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वेळा निवेदन देवुनही प्रश्न न सुटल्यामुळे लोकशाही मार्गाने पारनेर तहसिल येथे सुरू केलेल्या पेरु वाटप आंदोलन दरम्यान पारनेर तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अरेरावीची भाषा वापरून शेतकऱ्यांना दम दाटी करून पेरू फेकून दिले व कलम १४४ नुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
तहसिलदारांवर कारवाई व्हावी व शिवपाणंद, शेतरस्ते ,पाझर तलाव दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी उपोषणकर्ते शरद पवळे ,संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी यांच्याशी चर्चा केली.तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्यावर सक्तीची रजेवर पाठवुन पारनेर येथुन बदलीवर पाठविण्यात येणार आहे. त्या संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार झाला आहे .
सप्तपदी अभियानाअंतर्गत दुबार सर्व कामे येत्या सहा महिन्यात आम्ही करणार आहोत. नगर जिल्ह्यासाठी आम्ही रोव्हर मशीनद्वारे येत्या सहा महिन्यात प्रथम पारनेर प्रायोगिक तत्त्वावर घेवून शिव पाणंद शेतरस्त्यांचे नियोजन करणार आहोत.या संबंधीचा पत्रव्यवहार आम्ही संबंधित विभागाकडे केला आहे याची ग्वाही देतो. अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली.चर्चेनंतर लेखी निवेदन देवुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.शरद पवळे यांनी सहकाऱ्यांबरोबर चर्चा करुन लेखी निवेदन स्वीकारुन उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.
यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,संजय कनिच्छे,भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूज, शंकर खैरे, राहूल दळवी,गुलाब बाभुळवाडे, विजय दळवी, विठ्ठल शिंदे, अनिल खोमणे, हौशिराम कुदळे , सोमनाथ फटांगडे ,बबन मावळे, रमेश दळवी, सखाराम भोसले, रोहीदास दळवी, नवनाथ दळवी, पोपट कनिच्छे, हरिभाऊ डोळसे, गजेंद्र सानवणे, संजय बंडी आदी शेतकऱ्यांसह विश्व हिंदू परिषदचे मुंकुल गंधे,विश्व हिंदू परिषद नगर, राहुरी वंचित बहुजन आघाडीचे संतोष घोडके ,शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्यासह आदी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनांनी पाठींबा दर्शविला.

पद्मभुषण थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे ,खासदार सुजयदादा विखेपाटील ,आमदार निलेश लंके ,सामाजिक संघटना ,पारनेर पत्रकार संघ यांनी सहकार्य केल्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.)फोटोओळ —
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याबरोबर चर्चा करतानी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व शेतकरी बांधव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button