सुपा म्हसने फाटा एमआयडीसीमध्ये कामगारांना संरक्षण नाहीच- रविश रासकर.

दत्ता ठुबे
पारनेर:-काल दुपारी दि.१० रोजी मायडीया कॅरीयर कंपनीबाहेर दोन कामगारांमध्ये ड्युटी सुटल्यावर वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर चाकूने वार केले. यासंदर्भात पोलिस ठाणे सुपा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीमध्ये कंपनी कोणत्याही कामगाराला सुरक्षा देत नाही हे यावरून सिद्ध होत आहे. कंपनी आमदार अणि खासदारांच्या माणसांना कामे देते मग सुरक्षेच्या बाबतीत हे आमदार खासदार झोपलेत का?हा जर असाच विषय एमआयडीसीमध्ये राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत राहणार नाही. या बाबतीत पोलिस स्टेशन अाणि एमआयडीसी ऑफिस नगर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला.
पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी याअगोदरही १० फेब्रुवारी २०२३ रोजी एसपी साहेबांना निवेदन दिले होते.परंतु त्याची कुठलीच दखल घेतली नाही.आजची वाढती गुन्हेगारी व कंपनीमधील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी म्हसनेफाटा चौकात स्वतंत्र पोलिस चौकी व्हावी व पोलिसांची गस्त गाडी फिरावी त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसेल. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी पोलिस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले.
नविन फेज २सुपा एमआयडीसीमधील वाढती गुन्हेगारी पाहता एमआयडीसी चौकात स्वतंत्र पोलिस चौकी करावी

रविश रासकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष