सोमनाथ वाघचौरे संगमनेर चे नवे डी वाय एसपी !

संगमनेर : येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची बदली झाल्यानंतर प्रभारी डीवायएसपी म्हणून संजय सातव यांनी काही काळ हा पदभार सांभाळला. या जागेवर आता नव्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे येत्या दोन दिवसात संगमनेर येथे डीवायएसपी या पदावर रुजू होणार असल्याचे वृत्त आहे.
भुसावळ येथील चांगल्या कामगिरीमुळे
सोमनाथ वाकचौरे एक सक्षम, खमक्या अधिकारी लाभणार संगमनेरला लाभणार आहे . भुसावळ शहरातील चोरी, डकैती, बलात्कार, छोटे-मोठे गुन्हे क्लिष्ट कारनामे अशा नानाविध गुन्हेगारीला जरब देत त्यांच्यावर वचक निर्माण करून ते हद्दपार करण्यासाठी गुन्हेगारांची यादीच पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी अपडेट केली.
एक सक्षम पोलीस अधिकारी म्हणून वाघचौरे पूर्वी शिर्डी येथे कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी भुसावळ येथे त्यांची बदली झाली. आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात येत्या दोन दिवसात ते कर्तव्यावर हजर होणार असल्याचे समजते. संगमनेर शहरातही वाढत जाणारी गुन्हेगारी, छोट्या- मोठ्या चोऱ्या, अवैध धंदे, दोन नंबरचे कारनामे, वाळू तस्करी – उपसा, गोमांस हे या शहरातील ज्वलंत आणि मोठे आव्हान सोमनाथ वाघचौरे या पोलीस अधिकाऱ्यापुढे उभे राहणार आहे.
आशावाद आहे की संगमनेर मधील शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास पोलीस प्रशासनाचाही मोठा वाटा असतो. सोमनाथ वाघचौरे तो नक्कीच आटोक्यात आणतील कारण वाघचौरे यांची एक अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी, कागदपत्राला महत्त्व देऊन अपडेट असणारा एक सक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. मूळचे चांदवड येथील रहिवाशी असलेले, अत्यंत मध्यमवर्गीय परिस्थितीतून त्यांनी आपले स्वतःचे करिअर घडवले. स्वकर्तुत्वाच्या जोरावर
येत्या एक-दोन वर्षात ते एडिशनल एसपी होतील. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये अत्यंत कडक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावलौकिक होता