बारावी परीक्षेत खिरविरे येथील सर्वोदय विदयालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
अकोले/प्रतिनिधी-
फेब्रुवारी,मार्च २०२३ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत सत्यनिकेत राजुर संस्थेच्या सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील उच्च माध्यमिक विदयालयातील विदयार्थांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत विदयालयाचा ध्वज फडकवत ठेवला आहे.
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील उच्च माध्यमिक विदयालयातील कला विभागाचा निकाल ९५% तर विज्ञान विभागाचा निकाल १०० % लागला असल्याची माहीती प्राचार्य लहानु पर्बत यांनी दिली.
कला विभागात निशा विठ्ठल भांगरे(७५.३३ %), कुसुम कृष्णा भांगरे (७३.८३%), काजल चिंधु डगळे(७०.१७% ) गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत.
तसेच विज्ञान विभागात तनुजा लक्ष्मण चंदगिर(७०.५०%), करण राजू आवारी ( ६६.३३%), विमल नामदेव घोरपडे(६५.३३% ) गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत.
यशस्वी विदयार्थ्यांना प्राचार्य लहानु पर्बत,प्रा. सचिन लगड,प्रा.विक्रम आंबरे,प्रा.रामदास डगळे, प्रा. योगेश शिंदे, प्रा.संगिता भांगरे, प्रा.वनिता बेंडकोळी, प्रा.योगेश बगाड, प्रकाश भांगरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सत्यनिकेतन संस्था व सर्वोदय विदयालय तसेच सर्व शिक्षक हे यशस्वी विदयार्थी घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात.विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विदयालय नेहमी आघाडीवर असते, असे गौरोद्गार काढत यशस्वी विदयार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर,अशोक मिस्त्री, विजय पवार व सर्व संचालक, विभागिय अधिकारी प्रकाश महाले, दिनेश शहा,पोलीस पाटील हिरामण बेणके,प्राचार्य लहानु पर्बत,लिपिक भास्कर सदगिर,ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत डगळे,उपसरपंच सुभाषशेठ बेणके, सर्व सदस्य, आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, स्थानिक स्कुल कमिटीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ, माजी विदयार्थी आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.