
शेवगाव दि 30
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरण पूरक जीवन पद्धती व खरीप पीक नियोजन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शंकर जाधव प्रगतशील शेतकरी, श्री. राजाराम गायकवाड, उप संचालक आत्मा अहमदनगर, डॉ. एस.एस. कौशिक प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ केव्हीके दहिगाव, कानिफनाथ मरकड तालुका कृषि अधिकारी, शेवगाव व श्री निलेश भागवत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेवगाव हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी हवामान पूरक कृषि पद्धती व बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामात योग्य पिकांच्या नियोजन विषयी उपस्थित कृषि अधिकारी व प्रगतशी शेतकरी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकर जाधव यांनी शेतकऱ्यांनी स्वतः पिकांचे उत्पादन घेऊन त्या उत्पादनांची विक्री स्वतः करण्याचे आव्हान केले. श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ यांनी बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामात योग्य पिकांच्या नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री. सचिन बडधे, राहुल पाटील, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. गवळी, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे तसेच कृषि विभाग अधिकारी व कर्मचारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना पर्यावरणाविषयी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचा पूर्ण नियोजन कृषी विज्ञान केंद्रातर्फे श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ व कृषी विभागाचा वतीने श्री निलेश भागवत यांनी केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नारायण निबे तर आभार इंजि. राहुल पाटील यांनी मानले.
