अहमदनगर

प्राचीन काळापासून सौंदर्य आणि स्त्री या अजोड आहे


नेल आर्टचा नगरमध्ये डेमो क्लास संपन्न


अहमदनगर-सौंदर्य आणि स्त्री या अजोड आहे. सौंदर्यासाठी स्त्री अगदी आदीम काळापासून प्रयत्न करते . प्राचीन काळातील स्त्रिया सुंदर द‍िसण्यासाठी सुगंधित उटण्याने किंवा पाण्यात गुलाब पाकळ्या टाकून स्नान करीत असत. थोडक्यात सौंदर्यलालसा चिरतरूण आहे. आताच्या काळात तर सौंदर्याच्या नावाने एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. अनेकविध सौंदर्य प्रसाधने या बाजाराचा हिस्सा आहेत. सौंदर्य वाढविण्याचे प्रत्येक साधन हे कुठे ना कुठे रचनात्मकता व कल्पकतेशी जोडले गेले आहे. मग वेगवेगळ्या पध्दतीच्या केशरचना असो किंवा कपाळावर लावण्यात येणार्‍या विविध आकारातील टिकल्या, किंवा ‘नेल आर्ट’ मधील चमकते तारे. शरीराच्या प्रत्येक भागाला सौंदर्याचा स्पर्श व्हावा यासाठी स्त्रिया अत्यंत जागरूक असतात. मग नखासारखा अतिशय लहान भाग का असेना. नखे सुंदर दिसण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविले जाते असे प्रतिपादन नेलं आर्टिस्ट अनुजा कांबळे यांनी केले
नगर मधील प्रतिबिंब शिक्षण संस्थेच्या वतीने नेल आर्टचा डेमो क्लास आयोजित करण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अनेक युवती व महिला या मध्ये सहभागी झाल्या होत्या नेल आर्टचा अर्थ वेगवेगळ्या पध्दतीने नखे सजविणे हा होय. मूळ रूपात याला आर्टिफिशिअल नेल टेक्नॉलॉजी म्हटले जाते. अमेरिकेत जवळपास 30 वर्षांआधी याची सुरूवात झाली. यात रंगबिरंगी नेलपेंटपासून छोटे छोटे तारे, मोती यांचा वापर केला जातो. यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये वेगळी जागा राखून ठेवली जाते. स्त्रिया वाट्टेल तितके पैसे खर्च करून नखे सजवितात. आपण स्वत:च्या कल्पनाशक्तीने नखे सजवू शकतो. नखांना‍ छिद्र पाडून त्यात आपण रिंगही घालू शकतो. अशा अनेक पध्दतींनी नखे सजवू शकतो. आवडत असल्यास प्रत्येक नख वेगवेगळ्या पध्दतीने रंगवू शकतो. आज बाजारात आर्टिफिशिअल नखंसुध्दा विक्रीला असतात. यामुळे आपण नखे वाढविण्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. नेल आर्ट करण्याचा खर्च 200 रूपयांपासून हजारो रूपयांपर्यत असतो.
क्लास मध्ये अनुजा मॅडम यांनी नेल एक्स्टेन्शन,जेल नेल्स,ऍक्रिलिक नेलं,पॉली नेल्सची माहिती व डेमो करून दाखविला, दार आठवड्यात दार गुरुवारी हा क्लास घेतला जाणार असून पुढील आठवड्यात ज्यांना या क्षेत्रात करियर करावयाचे आहे त्याचा साठी १५ दिवसाचा मास्टर कलास स्पार्कल स्टुडिओ,सातभाई गल्ली दिल्लीगेट,अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे तरी या क्लास चा जास्तीत जास्त युवती व महिलांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्कशॉपमधे सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी स्पार्कल मेकअप स्टुडिओ,स्टेट बँक शेजारी, दिल्लीगेट,अहमदनगर, मो नं ९८५०२६२५९५/९२८४९३०६७४
वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button