एस.एस.सी.परीक्षेत कु.सुदर्शन खोडदे कु.सिध्देश आंबे चे यश !

आ.निलेश लंके यांनी सिध्देश,सुदर्शन व सर्व यश संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा !
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पारनेर शहरातील दिवंगत युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कै.समीर आंबे तसेच डिकसळ या छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षिका असनाऱ्या श्रीमती ज्योती आंबे यांचे चिरंजीव सिध्देश आंबे या विद्यार्थ्यांनी आपल्या मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने परिश्रम घेत , एस.एस.सी .परीक्षेत पारनेर पब्लिक स्कूलमध्ये दैदीप्यमान यश संपादित करत 97 % गुण मिळवत आपल्या गुणवत्तेचे दर्शन घडवून दिले आहे .
त्याच बरोबर पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील शिक्षक परिवारातील विद्यार्थी असलेला , आजोबा प्राथमिक शिक्षक,आई आणि वडील हे दोन्ही पण शिक्षक परंतु वडिलांच्या निधनानंतर आई श्रीमती अनिता रामकृष्ण खोडदे या राळेगण थेरपाळ येथे जिल्हा प्राथमिक शाळेत नोकरी करतात.त्यांच्या व शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
त्याला हे यश मिळाले असुन कु.सुदर्शन रामकृष्ण खोडदे
विद्याधाम प्रशाला शिरूर येथे इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावत 99 % गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
कु.सिध्देश समीर आंबे व कु.सुदर्शन खोडदे यांच्यासह पारनेर तालुक्यातून गुणवत्तेच्या यादीत चमकलेल्या सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांना पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करत त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सिद्धेश व सुदर्शन यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होत असुन सिद्धेश व सुदर्शन हे कौतुकाचा विषय ठरला आहे.