नगरमध्ये होरनाडू कन्नडिंगर संघाचे संमेलन संपन्न

दत्ता ठुबे
अहमदनगर- होरनाडू कन्नडिंगर संघ अहमदनगरचे वार्षिक स्नेहसंमेलन व जनरल मिटिंग माउली सभागृहात संपन्न झाली.कार्यक्रमाचे उदघाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी अध्यक्ष के के शेट्टी,डॉ. दीपक,मंगलोर येथील स्टॅन्ड अप कॉमेडियन शोचे विठ्ठल नाईक,नित्यानंद नाईक,के गणेश,के डी राव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात शेट्टी म्हणाले संघाची प्रगती होत आहे.नगरचा होरनाडू कन्नडिंगर संघ अनेक वर्षांपासून काम करत आहे. लोकांना अडचणीच्या वेळेला मदत व्हावी यासाठी याची स्थापना करण्यात आली. नगरमधील रहिवासी त्यांच्या सहभागाने सांस्कृतिक,शैक्षणिक विविध कार्यक्रम वर्षभर आयोजन करतो त्यासाठी सदस्य तन मन धनाने मदत करतात
आ.जगताप यांनी संघाच्या कामाचे व कन्नड समाज बांधवांच्या एकजुटीचे कौतुक केले.ते म्हणाले साऊथ वरून येऊन येथे रोजगाराची संधी लोकांना उपलब्ध करून दिली.डॉ.दीपक यांचे कोविड काळातील काम उल्लेखनीय आहे.त्यासाठी जागतिक स्तरावर पुरस्कार मिळाला आहे हे संघाला व नगरकरांना भूषणावह आहे.सर्वांसाठी कोरोनात हा समाज मदतीला पुढे आला होता असेच समाजोपयोगी काम संघाने करावे.
यावेळी क्रांती नाईक यांनी निओग्राफी मध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिल्या. या मिरर इमेज मध्ये असल्याने त्यासाठी आरशामध्ये पाहून वाचाव्या लागतात त्याचेही राज्यात कौतुक झाले याबद्दल त्याचा सन्मान करून सत्कार आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नेहमी सहकार्य करणारे उद्योजक प्रदीप पंजाबी यांचाही सत्कार करण्यात आला
वार्षिक अहवाल के डी राव यांनी मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी भट यांनी तर आभार सेक्रेटरी नित्यानंद नाईक यांनी मानले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयावर चर्चा,विविध खेळ,स्नेहभोजनआयोजित करण्यात आले होते तसेच मंगलोर येथील स्टॅन्ड अप कॉमेडियन शोचे विठ्ठल नाईक यांनी शो सादर केला कार्यक्रमास मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते तर शिरूरसह इतर ठिकाणाहूनही लोक आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ व लेडीज ग्रुपने प्रयत्न केले.