अकोले नगरपंचायत निवडणुकीत 80.52 टक्के मतदान, उद्या फैसला!

अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायत च्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी चार प्रभागांमध्ये मतदान झाले या मतदानात आज दिवसभर सरासरी 80.52 टक्के मतदान झाले
प्रभाग क्रमांक चार मधे 76.25 टक्के, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 81.17 % ,प्रभाग क्रमांक 13 मध्ये 85.20%, प्रभाग क्रमांक 14 मध्ये 81.52 टक्के मतदान झाले
आज झालेल्या या निवडणुकीत चार प्रभागात 3हजार137 मतदारांपैकी 1274 पुरुष आणि 1252 स्त्री मतदार असे 2हजार 526 मतदारांनी मतदान केले
अकोले नगर पंचायत झालेले मतदान
प्रभागनिहाय एकूण झालेले टक्केवारी

राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना आघाडी,भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढती दिसून आल्या यापूर्वी झालेल्या तेरा प्रभागातील मतदान आणि आज झालेल्या चार प्रभागातील मतदानाची एकत्रित मतमोजणी उद्या बुधवारी दिनांक 19 रोजी सकाळी सुरू होणार आहे यामुळे आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटेआणि माजी आमदार वैभव पिचड यांनी या नगरपंचायत निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लागली निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आता फक्त निकालाची प्रतीक्षा बाकी असल्याने तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे