पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील , कंपनीच्या घातक धुराबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी

मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिले निवेदन
प्रतिनिधी पारनेर : प्रशासनाला इथून मागे वारंवार निवेदन देऊन देखील व एमआयडीसी ऑफिसला पण अर्ज देऊन देखील या कंपनीवरती कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या अगोदर नाशिक प्रदूषण विभागाची गाडी एमआयडीसी परिसरात आली होती.पण ती गाडी आली आणि पण त्यावेळेस पूर्ण एमआयडीसी ने धूर हा बंद ठेवला होता. कामाची मोठी भट्टी बंद ठेवली होती आणि ते कंपनी समोर आले,सांगून आले त्या कंपनीवर धाड मारली पाहिजे होती परंतु प्रदुषण अधिकारीही कारवाई न करताच निघून गेले.जेव्हा ती गाडी त्या कंपनी समोर आली त्या त्यावेळेस त्यांनी मोठी भट्टी बंद ठेवली होती. पूर्ण एमआयडीसीचे कामकाज हे बंद ठेवले होते. दोन दिवस जोपर्यंत ती गाडी त्या कंपनी समोरील एमआयडीसीत होती तोपर्यंत कोणत्याही कंपनीने आणि त्या गणराज कंपनीने धूर सोडला नाही.
ही गणराज कंपनी नगर पुणे हायवे लगत आहे त्याशेजारी हॉटेल्स व बागायत शेती आहे.ही कंपनी रात्री जास्त धुर सोडत असते त्याचा शाळा, पेट्रोल पंप, प्रवासी आणि अन्नधान्य,खाद्यपदार्थावर खूप वाईट परिणाम होतो. आणि मनुष्याच्या प्रकृतीवर पण वाईट परिणाम होतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालावर इतका वाईट परिणाम होतो की तिथले शेती माल पण व्यवस्थित पिकत नाहीत.
पंधरा दिवसात जर या कंपनीवर कारवाई केली नाही. याच्यावर जर प्रतिबंध घातला नाही तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसानंतर मुंबई प्रदूषण विभागाच्या ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे रासकर यांनी सदर निवेदनात म्हटले आहे तसेच या कंपनीसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.