पारनेर तहसील मधील पुरवठा निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले पारनेर पोलिसात गुन्हा दाखल

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक विठ्ठल मच्छिंद्र काकडे या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आज ही कारवाई केली
-.तक्रारदार हे यादववाडी,ता पारनेर येथील जय जवान बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्समन म्हणून २०२० पासून काम करत आहेत,त्यांनी मागील तीन महिन्यापासून वाडेगव्हान ता पारनेर येथील लाभार्थ्यांना ते काम करत असलेल्या स्वतः धान्य दुकानातून धान्य वाटप केले म्हणून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी यातील पुरवठा निरीक्षक काकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे २००००/-₹ लाचेची मागणी केली या बाबतची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कडे तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार दिनांक २४/०५/२०२३ रोजी तहसील कार्यलय,पारनेर येथे पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान यातील आलोसे काकडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे लाच मागणी करून तडजोडीअंती १५०००/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक ०१/०७/२०२३ रोजी पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सापळा अधिकारी-शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
सापळा पथक -पोलीस अंमलदार पोना रमेश चौधरी, पोलीस अंमलदार सचिन सुद्रूक,बाबासाहेब कराड चालक- दशरथ लाड,
मार्गदर्शक मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांनी ही कारवाई केली
•••••••••••••••••••••••-
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४