इतर

अडचणीच्या काळात मी तुमच्यासोबत; डॉ. श्रीकांत पठारेंनी कामोठेकरांना दिला विश्वास

कामोठे येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने स्नेह मेळावा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
मुंबईतील कामोठे येथे पारनेर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या बांधवांनी शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजयराव औटी तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीत युवासेना उपतालुका प्रमुख महेश शिंगोटे, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख किसनराव चौधरी, सरपंच रामदास खोसे, शिवसेना शाखा प्रमुख संतोष रोकडे यांच्या वतीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर उपस्थित होते तसेच शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी ही उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की, पारनेर तालुक्यातील मुंबई स्थित रहिवाशांनी व कामोठेकर जनतेने ना. विजयराव औटी साहेबांवर खूप प्रेम केल आहे. भविष्य काळात काही अडचण आल्यास ना. विजय औटी साहेबांचा प्रतिनिधी या नात्याने कधीही संपर्क करा. मी सदैव हजर राहील. अडचणीच्या व संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे.
कामोठेकरांच्या वतीने शिवसेना प्रवक्त्या सुवर्णाताई वाळुंज, कुंडलिक वाफारे, पोपट आवारे, बाळासाहेब मुंढे, विनायक देशमाने, सुरेशराव भोसले, शाखाप्रमुख बाबाजी ढोमे यांनी मनोगत व्यक्त करत आपली भूमिका मांडली.
यावेळी कुंडलिक वाफारे यांनी येणाऱ्या काळात पारनेर तालुक्यातील कामोठेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तसेच शिवसेना पारनेर तालुका यांच्यापाठीमागे ताकदीने उभे राहतील अशी ग्वाही दिली.
सदर स्नेह मेळाव्यासाठी रवींद्र कड, बन्सी पागिरे, ठकाजी वाफारे, योगेश पुंडे, बाळासाहेब झावरे, नारायण उंडे, प्रमिलाताई आहेर, वर्षाताई चौधरी, चंद्रकला वाळुंज, सुनीता येवले, रुपाली चौधरी, सूत्रसंचालन विभाग संघटक रवींद्र कड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button