माळीझाप येथे सप्ताहाची सांगता उत्साहात

अकोले /प्रतिनिधी
श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माळीझाप येथे अखंड हरीनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.
यावेळी महिला, तरुणी यांनी डोक्यावर कलश घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. भजनी मंडळाच्या तालमुदुंगाच्या गजरात सर्व ग्रामस्थ, तरुण, पदाधिकारी तन, मन, धनाने कार्यरत होते. सप्ताहाचे हे ६४ वे वर्ष होते. न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक परिवारीक समई समळ्याच्या पद्धतीने पार पाडली. ज्ञानेश्वरी माऊलींचा जयघोष करत, भजन म्हणत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यावेळी माळीझाप ते अकोले शहरातून श्री संत सावता महाराजांचे प्रतिमेची सवाद्य मिरवणूक झाली. सकाळी १०ते१२ वाजेपर्यंत ह.भ.प गोविंद महाराज करंजकर यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन झाले. सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिलिप मंडलिक, प्रमोद मंडलिक, मच्छिंद्र मंडलिक, कैलास मंडलिक, शिवाजी थोरात, गोरख मंडलिक, सोन्याबापू मंडलिक, भास्कर मंडलिक, वसंत मंडलिक, गणेश मंडलिक व माळीझाप भजनी मंडळ व ग्रामस्थ व महिलांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रमोद मंडलिक यांनी मानले.
