नेप्तीत कुत्र्याच्या तावडीतून रामदास फुले यांनी फ्लेमिंगोला दिले जीवदान .

.
अहमदनगर .नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले हे पहाटे सहाच्या दरम्यान फिरायला चालले असता त्यांना कुत्र्याचा आवाज आला त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता रानटी, मोकाट कुत्रे आकाराने मोठा व आकर्षक रंगाच्या एका युरोपियन फ्लेमिंगो या पक्षावर तुटून पडले होते. नेप्ती शिवारात फुले ,बेल्हेकर मळ्यात वाट चुकलेला फ्लेमिंगो पक्षी गोरख शिंदे यांच्या शेतात होता. त्यांच्यावर रानटी, मोकाट कुत्रे हल्ला करीत होते .यावेळी रामदास फुले यांनी जीवाची परवा न करता मोकाट रानटी कुत्र्याच्या तावडीतून रक्तभांबळ फ्लेमिंगो पक्षाचा जीव वाचवला .त्यानंतर दादू दरेकर यांनी नेप्तीचे उपसरपंच संजय जपकर यांना फोन करून सविस्तर माहिती सांगितली .उपसरपंच संजय जपकर यांनी तातडीने वन विभागाला फोन करून कळवले .वन विभागाचे सखाराम येणारे व चेमटे साहेब यांनी त्वरित दखल घेऊन नेप्ती येथे येऊन पक्षाला वन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे या पक्षाच्या पायाला व पंखाला जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्यावर त्या अनुषंगाने उपचार करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, उपसरपंच संजय जपकर, रमेश बेल्हेकर, अक्षय चौरे ,दादु दरेकर, गोरख शिंदे, आकाश महाराज फुले, अरुण बेल्हेकर, गणेश फुले, धोंडीभाऊ नरवडे ,राजू फुले ,योगेश नरवडे ,अशोक बेल्हेकर व परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते .