कोतुळ पूल ते वाघमारे वस्ती रस्ता डांबरीकरण करा

कोतूळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा नदी काठी असणाऱ्या वाघमारे वस्ती चा रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
पिंपळगाव खांड धरण बांधल्याने वाघमारे वस्ती चा रस्ता पाण्याखालीं गेला आहे यामुळे वाडीच्या रहिवाशांची रस्त्या अभावी प्रचंड गैरसोय होत आहे धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे रस्ता कायमस्वरूपी बंद झाला आहे सध्या अस्तित्वात असणारा परदेशवाडी मार्गे वाघमारे वस्ती या रस्त्याची अवस्था पावसाने अतिशय वाईट झाली या रस्त्यावरून भाजीपाला, दूध वाहतूक करताना मोट्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शाळकरी मुलां ना तर अतिशय कसरत करत शाळेत जावे लागत आहे
या रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणी साठी आमदार किरण लहामटे यांनी लक्ष घालावे अशी मागणी
भास्कर वाघमारे , संतोष वाघमारे ,बबन वाघमारे सुभाष वाघमारे, किशोर वाघमारे पांडु वाघमारे ,संदीप वाघमारे, रामदास गीते, दिलीप गीते , बाळू वाघमारे,
सीताराम गीते यांनी मागणी केली आहे

पिंपळगाव खांड धरणामुळे शेती बागायत झाल्याची एक चांगली बाजू झाली परंतु दुसरी रस्ता पाण्यात गेला या बाबत कोणीही लोक प्रतिनिधीने दखल घेतली नाही ही अतिशय वाईट बाजू लोकांना सहन करावी लागत आहे
भास्कर वाघमारे