जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ला निषेधार्थ अकोले कडकडीत बंद
अकोल प्रतिनिधी
अंतरवाली, तालुका -अंबड जिल्हा जालना येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी सुरू असलेल्या शांतता पूर्ण आंदोल कांवर पोलिसांनी बाळाचा वापर करून लाटी हल्ला व गोळीबार केला यात लहान मुले युवक महिला यांना अमानुष मारहाण केली मराठा आरक्षणासह इतरही मागण्याची मराठा समाज गेली 25 वर्षापासून मागणी करत आहे परंतु या पीडित समाजाला न्याय देण्याचे काम कोणीही करू शकले नाही तरी अत्यंत शांतता पूर्ण मार्गाने लोक रस्त्यावर उतरून जगाला आदर्श आंदोलनाची नवी दिशा दिली अशा या शांततामय आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ला चा आम्ही सर्वपक्षीय जाती धर्मातील नागरिकानी शहर कडकडीत बंद करून निषेध व्यक्त केला यावेळी आंदोलकांनी पुढील मागण्या केल्या
1 )या लाठी हल्ल्यास जबाबदार पोलीस अधिक्षक व इतर अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे
2 )मराठा समाजाला कायदेशीर तरतूद्दीनुसार आरक्षण द्या.
3 )अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे
4 )मराठा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थांना भरीव अनुदान द्यावे
5) शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात पाचशे विद्यार्थ्यांची वसतीगृह निर्माण प्रक्रिया सुरू करावी या मागण्या करण्यात आल्या आंदोलनात आंदोलनासाठी डॉ अजित नवले , डॉ संदीप कडलग , शिवाजी धुमाळ , , संदीप शेणकर,नितीन नाईकवाडी,राहुल शेटे, सचिन शेटे,दत्ता नवले , चंद्रकांत नवले सर,बाळासाहेब भोर, बबनराव तिकांडे,विनयजी सावंत, भानुदास तिकांडे,विनोदराव हांडे तुळशीराम कातोरे, शाहिद भाई फारुकी, आरिफ तांबोळी,परशुराम शेळके शांताराम संगारे,विजय आवारी तुळशीराम कातोरे,लहानु नाईकवाडी, भास्कर खांडगे, भानुदास तिकांडे,संगीता ताई साळवे,तनुजा घोलप निखिल जगताप,गणेश कानवडे,नितीन नाईकवाडी, गणेश पापळ,नवनाथ शेटे शिवाजी वंडेकर दादा पाटील वाकचौरे भाऊसाहेब नाईकवाडी एकनाथ मेंगाळ,संपतराव पवार, राजेंद्र कुमकर, सुरेश नवले, संदीप शेणकर मोहसीन शेख,डॉ असिफ तांबोळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते