रंधा धबधबा येथील घोरपडा देवी देवस्थानच्या मधील गैरकारभाराच्या चौकशी साठी उपोषणाचा इशारा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या रंधा धबधबा येथील घोरपडा देवी देवस्थानच्या मधील गैरकारभाराची चौकशी करा. गैरव्यवहार करणाऱ्यां वर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी मंगळा भदू पटेकर आणि लहू रामा ढगे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे
घोरपड देवी देवस्थानचे विश्वस्त मंगळा भदु पटेकर ,लहू रामा ढगे यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , तहसीलदार अकोले ,धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांना निवेदन दिले आहे
या निवेदनात म्हटले आहे की घोरपड देवी देवस्थानच्या संशयास्पद कामकाजाबाबत आम्ही वेळो वेळी तक्रारी केल्या परंतु दखल घेतली जात नाही
दि.०३/०७/२०२२ रोजी तहसिल कार्यालय अकोले येथे उपोषणास बसणाार असलेचा इशारा देण्यात आला होता. परंतु संचारबंदी कलम लागू असल्याने
उपोषणास बसता येणार नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक राजुर यांनी सांगून उपोषण न करण्याबाबत विनंती केली त्यावरून उपोषण मागे घेतले
सदरची बाब ही धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांचे कडे असल्याने दि. ११/०७/२०२३ रोजी मा. उपधर्मादाय आयुक्त अहमदनगर यांचेकडेस अहवाल सादर केलेला आहे तसेच नियमावली असले शिवाय कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन घ्यावयाचे नाही असे तोंडी श्री. गणेश इंगळे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजुर यांनी आम्हांस सांगियले परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही
देणगी पावत्या, तसेच गुप्तदान , नवस पूर्ती करताना भाविकां कडून मिळणारे दाग दागिने यांचा यांचा हिशोब व ताळमेळ लागत नाही काही ठराविक लोकच भाविकां च्या दानावर डल्ला मारत आहे
बोगस जाहिर प्रगटन व बनावट प्रोसेडिंग सादर करुन ठेका देण्यात आलेला आहे असे भासवून
बनावट कागद पत्रांच्या आधारे भक्त निवास व पार्किंग चा ठेका चालविला जात आहे यामुळे हरी भाऊ बांबेरे व विजय विठ्ठल वेडे या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु सहाय्यक पोलिस निरीक्षक राजुर यांचेकडुन टाळाटाळ होत असल्याने दि. ०५/०९/२०२३ रोजी तहसिल कार्यालय अकोले येथे सकाळी १०.०० वा उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदना द्वारे श्री मंगळा पटेकर लहू ढगे यांनी दिला आहे
