शेवगांव तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन – आमदार मोनिकाताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
या वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीपाची पिके जळून गेली आहेत. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याची टंचाईची परिस्थीती अनेक गावे व वाडया वस्त्यावर निर्माण होत आहे. टँकरने पिण्याचे पाणी देण्याची गंभीर परिस्थीती निर्माण झालेली आहे.
या पार्श्चभूमीवर शेवगांव तालुक्यातील टंचाई परिस्थीती,चा आढावा घेण्याबरोबरच जलजीवन मिशन योजना कामे, वीज प्रश्न, रोहयो कामांची मागणी, जलसंधारण, रस्ते, पाटपाणी, कृषी विभाग, ताजनापुर उपसा सिंचन योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा, कायदा व सुव्यवस्था, या सर्व कामांचा व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन, व संबंधीत सर्व विभागाचे प्रमुख यांचे समवेत टंचाई व कामांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
त्यानुसार शेवगांव तालुक्याची टंचाई आढावा बैठक मंगळवार दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. अजिक्य लॉन्स, नेवासा रोड, शेवगांव येथे होणार आहे. या बैठकीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.