राशिभविष्य

आजचे पंचांग व राशीभविष्य दि.१३/०९/२०२३

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४५
दिनांक :- १३/०९/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- निज श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २८:५०,
नक्षत्र :- मघा समाप्ति २६:०१,
योग :- सिद्ध समाप्ति २६:०१,
करण :- विष्टि समाप्ति १५:३६,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:२५ ते ०१:५७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१८ ते ०७:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०१ ते ०६:३३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शिवरात्रि, उत्तरा रवि २७:२६, वाहन हत्ती, स्त्री.स्त्री.सू.सू., भद्रा १५:३६ प.,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४५
दिनांक = १३/०९/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसोबत शांततेत दिवस घालवाल असं ग्रहमान आहे. मित्रांसोबत काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खूप दिवसांनी एकत्र आल्याने मन शांत होईल. पत्नीसोबत वेळ घालवल्याने काही समस्या सोडवण्यात मदत होईल. उद्योग धंद्यात भरभराट होईल. भागीदारीच्या धंद्यात नवा पार्टनर मिळेल. त्यामुळे आर्थिक अडचण सुटेल.

वृषभ
आजचा दिवस आरोग्यदायी असेल. त्यामुळे एकदम आनंदी असाल आणि आत्मविश्वास दुणावलेला राहील. आरोग्य विषयक तक्रारींचं निवारण झाल्याने जीव भांड्यात पडेल. या कालावधीत खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. अविवाहित लोकांना काही स्थळं पाहण्याचा योग जुळून येईल.

मिथुन
आजचा दिवस तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार असल्याने आनंदी राहाल. यशाची नवी शिखरं या काळात गाठाल. कौटुंबिक पातळीवर आनंदी राहाल. नवीन योजना मार्गी लावण्यास मित्रांची मदत होईल.

कर्क
आजचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. भौतिक सुखांसाठी पैसे खर्च कराल. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होईल. पण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त खर्च करणे टाळा. भविष्याच्या दृष्टीकोनातून पैशांची बचत करा.

सिंह
आजचा दिवस कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. दिवसभर केलेल्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्ही तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. व्यवसायात कोणताही करार करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. आर्थिक फटका बसू शकतो.

कन्या
आज मुलाच्या करिअरमध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीकोनातून व्यस्त असाल. करिअरचा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाच्या निकालाबद्दल तुम्हाला चांगली बातमी कानावर येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक व्यवसायातही गुंतवणूक करू शकता.

तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी चिंताजनक असेल असं ग्रहमान आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विनाकारण वाद करणं टाळा. गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं काम आज पूर्ण होऊ शकते. प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल.

वृश्चिक
आज आर्थिक स्तरावर कोणलाही कुठलाही शब्द देऊ नका. तुमचं नुकसान होऊ शकतं. गुप्तशत्रूंकडून एखादा सापळा रचलेला असू शकतो. जोखिम असलेली गुंतवणूक करणे किंवा इतरांना पैसे देणे टाळा. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योग करा. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अधिक मेहनत घ्यावी.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. समाजात तुमच्या शब्दाला मान असल्याचं दिसून येईल. कुटुंबाच्या हितासाठी ठोस पाऊल उचलू शकता. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकते. पण त्याचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही. तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर
नोकरी शोधणाऱ्या जातकांना आज नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन पुढच्या योजना आखा. अविवाहित लोकांना चांगला जोडीदार मिळू शकतो. घरगुती जीवनात जोडीदारापासून कोणतंही गोष्ट लपवू नका. अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. कौटुंबिक आणि व्यवसायात घडलेल्या घटनांमुळे त्रास होईल. जवळच्या व्यक्तींकडून तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक गणित बिघडू शकते. कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. त्यामुळे कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहने चालवताना काळजी घ्यावी लागेल.

मीन
गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल.तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. तुम्हाला तुमची कौशल्ये सुधारण्यास मदत मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button