बोधेगाव येथे नवगत विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी महाविद्यालयांमध्ये 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान प्रथम वर्ष प्रवेशित तसेच डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम पार पडला .
संस्थेचे व महाविद्यालयाच्या ध्येयधोरणाबाबत माहिती तसेच विद्यार्थ्यांना देत असलेल्या सोयी सुविधा व त्यांच्या करिता राबवत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत गांगुर्डे सर यांनी विद्यार्थी यांचे महाविद्यालयास निवडीबाबत स्वागत केले व संस्थेचे व महाविद्यालयाचे व्हीजन व मिशन सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जयप्रकाश सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणांनी विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षणात उत्कृष्टतेसाठी प्रेरित केले.समर्पण आणि उत्कृष्टतेनचे महत्त्व पटवून दिले.
तसेच डॉ. प्रशांत पाटील यांनी औषध विकास प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल उद्योगातील क्लिनिकल चाचण्यांचे महत्त्व सांगितले. डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य राजेश मोकाटे यांनी बी.फार्मसी नंतर असलेल्या विविध संधी यांची माहिती दिली .महाविद्यालयाचे माजी विद्यार्थींनी कु. सरोज काळे व कुमार श्री. प्रशांत सानप यांनी आपले महाविद्यालयातील अनुभव व मनोगत व्यक्त केले .सर्व विषय शिक्षकांनी आपल्या आपल्या विषयाची विस्तृत माहिती दिली. शैक्षणिक समन्वयक प्रा.संदीप बडधे यांनी बी फार्मसी कोर्स व परीक्षा पद्धती यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.
संस्थेच्या वतीने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख मा. ऍड. डॉ.विद्याधरजी काकडे साहेब जिल्हा परिषद सदस्य मा. सौ. हर्षदाताई काकडे तसेच संस्थेचे विश्वस्त भैय्यासाहेब काकडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री लक्ष्मणराव बिटाळ तसेच महाविद्यालयाचे समन्वयक श्री . दसपुते संपतराव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.