नगर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करा -ज्ञानेश्वर लेंडे

–
अकोले/प्रतिनिधी–
नगर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करा अशी मागणी मनसे कार्यकर्ते नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन केली याबाबत त्यांना निवेदन दिले आहे
,शासन निर्णय नुसार अहमदनगर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती ला अद्यापही सुरुवात झाली नाही . बाकी जिल्ह्यातील विचार करता ठाणे ,पालघर ,नंदुरबार ,नांदेड ,धुळे, गडचिरोली ,नाशिक या जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर झाल्या असून नगर जिल्हातील अजून कुठलीच प्रक्रिया झालेली नाही .या बाबत दोन ते तीन वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन हि उडवा उडवी ची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार विदयार्थ्यानी मनसे कार्यकर्ते ज्ञानेश्वर लेंडे यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने ज्ञानेश्वर लेंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली .तरी लवकरात लवकर भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल असे आश्वासन मुख्यकार्यकारी अधिकार यांनी दिले. तसेच भरती प्रक्रिया चालू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.असे ज्ञानेश्वर लेंडे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्यासह विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .