शासन निर्णय

१ ऑक्टोबर आता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा  होणार !

मुंबई -१ ऑक्टोबर  आता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस
साजरा  होणार आहे तसा शासन  निर्णय राज्य शासनाने काढला आहे

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तारीख: २६ सप्टेंबर, २०२३। रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे 

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. ज्येष्ठना २०१६/प्र.क्र.७१/सामासु, दिनांक ०९ जुलै, २००८ अन्वये निर्गमित करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस”
(International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी “१ऑक्टोबर, २०२३” हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व त्यानिमित्ताने वृत्तपत्रात जाहिराती देणे, सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र / परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. असे आदेश दिले आहेत

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस राज्यात सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका / नगर परिषदांमार्फत आयोजित करण्यात यावा.
सदर दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी वरीलप्रमाणे विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात यावेत.असे आदेशात म्हटले आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button