आबिटखिंड येथे महात्मा गांधी जयंती साजरी

कोतुळ प्रतिनिधी:
आबिटखिंड (ता. अकोले) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रम साजरे करण्यात आले.यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय परिसर स्वच्छ करुन झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच यमुना घनकुटे होत्या.
यावेळी उपसरपंच ओंकार भारमल, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, विमल भोजने, गणपत घनकुटे, सोमनाथ मुठे, लता घनकुटे, सुलाबाई भवारी यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी ओम राऊत, आदिती घनकुटे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सरपंच यमुना घनकुटे, उपसरपंच ओंकार भारमल, विमल भोजने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.