आबासाहेब काकडे विद्यालयास इंडियन टॅलेंट सर्च चा”महाराष्ट्र समाज गौरव” पुरस्कार

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास इंडियन टॅलेंट सर्च या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून “महाराष्ट्र समाज भूषण” पुरस्कार मिळाला
दि.१ऑक्टोबर २०२३ रोजी लातूर येथे नामदार श्री.संजय बनसोडे ( महाराष्ट्र क्रीडा ,युवा कल्याण व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच शिक्षक आमदार मा.श्री विक्रमजी काळे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या शुभहस्ते विद्यालयाचे प्राचार्य श्री संपत दसपुते, पर्यवेक्षक श्री शिवाजी पोटभरे यांच्यासह विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी स्वीकारला.
संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधर काकडे यांची दूरदृष्टी ,जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांचे मार्गदर्शन व विद्यालयातील तत्कालीन प्राचार्य , सर्व प्रशासक व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या प्रयत्नाने मागील २ वर्षांमध्ये covid-19 च्या परिस्थितीवर विद्यालयाने यशस्वी मात करत नवनवीन उपक्रम राबवून वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून (झूम, गुगलमिंट, व्हॉट्सॲप, टिंचमिंट, गृहभेटी,विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन , हस्तलिखित नोट्स)शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले.
याची दखल घेत इंडियन टॅलेंट सर्च या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने विद्यालयास “महाराष्ट्र समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधर काकडे , सौ. हर्षदाताई काकडे, जि.प. सदस्या, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ, विश्वस्त पृथ्वीसिंगभैय्या काकडे, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व पालक बंधू-भगिनींकडून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.