इतर

निस्वार्थ भावनेतून केलेल्या कार्याला यश मिळतेच -ज्ञानदेव गवारे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
समाजामध्ये कोणत्याही घटकासाठी किंवा कोणत्याही कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन निस्वार्थ भावनेने केलेले काम हे समाज स्वीकारतोच व असे केलेले काम हे समाजाच्या सत्कारास पात्रच होतात.त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात कार्य कराताना ते सरळ भावनेतून केल्यास त्या व्यक्ती सत्कारास पात्रच होतात असे मत माजी अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांनी व्यक्त केले.


शेवगाव – नेवासा राजमार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर मंदिराच्या प्रांगणात सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून ज्ञानदेव गवारे साहेब बोलत होते. पत्रकार क्षेत्रात तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये शहाराम आगळे करत असलेल्या पत्रकारितेची दखल घेऊन नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील समाजसेवक लक्ष्मण मोहिटे पाटील यांनी जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न पुरस्काराने गौरविले त्याबद्दल शेतकरी बचाव जन आंदोलन व काळेश्वर देवस्थानच्या वतीने आगळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पत्रकारिते समोरील आव्हाने त्यांनी आपल्या भाषणात परखड मांडले. आपण निवडलेल्या क्षेत्रांमध्ये स्वच्छ व सरळ भावनेने काम केल्यास समाज त्या कार्याची दखल घेतोच त्यामुळे आपण आपल्या कार्या लाच केंद्रबिंदू मानून काम करावे. असेही त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
यावेळी काळेश्वर देवस्थानचे प्रमुख लहानु महाराज कराळे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, ज्येष्ठ पत्रकार आर आर माने,संतोष मेरड, रामदास बडे, ग्रामीण साहित्यिक राजेश लोंढे, डॉ. महेश दुकळे, रामेश्वर उभेदळ, शैलेश नारळकर, अशोक फटांगरे, बाळकृष्ण टोगे, शेषेराव काळे, अजय माने, बाळासाहेब दुकळे, कारभारी दिवटे, देवदान वाघमारे, यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button