नेप्तीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.

नेप्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- संजय जपकर
अहमदनगर- नगर तालुक्यातील नेप्ती येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले
नेप्ती येथील पंचशील नगर येथे दलित वस्ती सुधार अंतर्गत ८ लाख रुपये व ग्रामनिधी अंतर्गत २ लाख रुपये खर्चून दलित वस्तीत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, १४व्या वित्त आयोगातून अंगणवाडी सुशोभीकरण अंतर्गत अंगणवाडी समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे साडेचार लाख रुपये, 15 वित्त आयोगा अंतर्गत चांदपीर वस्ती शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लाख रुपये, माळ्याचा मळा रस्ता मजबुतीकरण करणे अडीच लाख रुपये, दलित वस्ती सुधार अंतर्गत पाचारणे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १२लाख रुपये, खळगा व रानमळा वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर सोलर बसविणे २लाख रुपये, आदि विविध विकास कामाचे भूमिपूजन माजी सरपंच विठ्ठल जपकर ,सरपंच संजय अशोक जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर यांच्या हस्ते करण्यात आले
.अनेक वर्षापासूनच्या मागण्या पूर्ण होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी मोठा विश्वास ठेवून आमच्या हातात सत्ता दिली .सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. विकास कामामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत. गावातील प्रत्येक भागातील प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे .सर्व माध्यमातून गावाला निधी आणण्यासाठी कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन अहोरात्र गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. नेप्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन उपसरपंच संजय जपकर यांनी केले.
यावेळी माजी सरपंच सुधाकर कदम ,मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार ,देवा होले ,माजी उपसरपंच फारुख सय्यद, शिवाजी होळकर, बाबासाहेब होळकर, जालिंदर शिंदे, रामदास फुले, ग्रामसेवक लालभाई शेख ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कदम ,दादू चौगुले , एकनाथ जपकर ,बंडू जपकर, शशी होळकर, सुरेश कदम, वसंत कदम,आनंदा कांडेकर ,विलास जपकर ,नानासाहेब बेल्हेकर, मच्छिंद्र होळकर, बापू साळवे ,संतोष कदम ,महेश कदम ,शंकर कदम, विनोद कदम ,अमोल कदम व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.