इतर

मराठा आरक्षण आंदोलना कडे दुर्लक्ष ! निषेधार्थ भातकुडगाव फाट्यावर रस्ता रोको आंदोलन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर चालू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

चार दिवस उलटून गेले तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयाकडून कुठलेही लेखी स्वरूपात पत्र न दिल्याने आमरण उपोषणास बसलेल्या भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणात सहभागी असलेले कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, शेतकरी बचावचे एकनाथ काळे यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून चार दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र न दिल्याने विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा व उपोषणास बसलेल्यांना वैद्यकीय मदत द्या अशा घोषणा देत. या घटनेचा निषेध करत सकल मराठा समाजाच्या वतीने भातकुडगाव फाटा चौफुल्यावर तब्बल दोन तास रस्ता रोको करून निषेध करण्यात आला.

यावेळी तहसीलदार राहुल गुरव यांनी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जाऊन या कामे कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. व यापुढील भातकुडगाव आरोग्य केंद्राला आपण लगेच लेखी दिले. असल्याची माहिती आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाला दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.

रस्ता रोको वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शिक्षक बँकेचे काकासाहेब घुले, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, तुकाराम शिंगटे, भाजपाचे विलासराव फाटके अविनाश महाराज लोखंडे यावेळी सकल मराठा समाजातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. आदींनी आपल्या भाषणातून शासनाचा निषेध केला.
यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवेदन देऊनही आंदोलकाकडे केलेलं दुर्लक्ष ही खेदाची गोष्ट आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सकल मराठा समाज हा शांततेच्या मार्गानेआंदोलन करत आहे मात्र आज चार दिवस उलटूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपोषणा संदर्भात पत्र न दिल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव तहसिलचा आम्ही निषेध करतो.

रामजी शिदोरे
तालुका अध्यक्ष प्रहार


अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे व शेवगाव – पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी मराठा आरक्षणाला समर्थन म्हणून राजीनामे द्यावेत व मराठ्यांच्या या लढ्यात भाग घ्यावा व सध्या चालू असलेल्या या शांततामय आंदोलनात सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा.मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता असूनही ही मागणी करतो. मराठा समाजाच्या भावना समजून घ्याल ही अपेक्षा


विलासराव फाटके
सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button