मराठा समाजाची वेदना घेऊन मनोज जरांगे पाटलाचा लढा – भारत महाराज लोढे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मराठा समाजातील पिढ्यान पिढ्याचा होत असलेला आन्याय दूर करायचा असेल तर मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आणि तीच वेदना घेऊन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथुन लढत आहे. त्यांना बळ देण्यासाठी सकल मराठा समाज न्याय हक्कांसाठी रस्त्यावर आहे. मात्र शासन आजुन साखर झोपेचे सोगं घेत आहे. मराठा आरक्षण मिळपर्यत स्वस्थ बसायचे नाही. यासाठी रस्त्यावर येवुन लढा लढवा लागेल. यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार तालुक्यातील मजलेशहर येथे आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्ते भारत महाराज लोढे यांनी व्यक्त केले. आमरण उपोषणाचा त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कार्य मराठा समाजाच्या आरक्षणा पुर्ते मर्यादित नसुन ते धर्म कार्य आहे. म्हणुन त्याना अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवजी महाराज व आई तुळजा भवानीचा आशिर्वाद त्याच्या पाठिशी आहे. हे चित्र उभ्या महाराष्टासह देश सध्या अनुभवत आहे.
यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, ज्ञानदेव फासाटे, बाळासाहेब लोंढे, दिनकर फटांगडे, मारुती लोंढे, रोहिदास पहिलवान, पोपट मुगुटमल, अंबादास बोरुडे, गणेश लोंढे, पांडुरंग लोंढे, गणेश फटांगडे, पांडुरंग मोटे, अदिनी आंदोलनास उपस्थित राहुन पठिबा दिला आहे.