राजूर च्या ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील कुस्ती मल्लांची सुवर्ण कामगिरी.

अकोले/प्रतिनिधी-
शेवगाव या ठिकाणी झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत राजुर येथील ॲड. एम.एन देशमुख महाविद्यालयातील मेमाणे प्रदीप दूंदा( ६० किलो प्रथम), कर्डिले युवराज ज्ञानेश्वर (१३०किलो प्रथम)
हराळ सुदर्शन दत्तराव (८६ किलो प्रथम) या तीन कुस्ती मल्लांनी आपापल्या वजन गटात सुवर्ण कामगिरी केली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती सोमेश्वर नगर या ठिकाणी होणाऱ्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे शारीरिक संचालक प्रा. विकास नवले व कुस्ती कोच तानाजी नरके यांनी दिली आहे.या यशस्वी कामगिरी बद्दल त्यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टी.एन.कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी, अशोक मिस्त्री,प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख,संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.