अयोध्या ला श्रीराम प्रभू चे मूर्तीप्राण प्रतिष्ठा साठी अकोले तालुक्यातून 5000 राम भक्तांना नेणार- पिचड

अकोले प्रतिनिधी
22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्या येथे श्रीराम प्रभू चे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमसाठी अकोले तालुक्यातून 5000 राम भक्तांना अयोध्या नेणार असल्याचे प्रतिपादन भाजप अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
काल संगमनेर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो अभियानाचे मेनरोड येथे आयोजित सभेत बोलत होते. कोपरगाव, संगमनेर व अकोले तालुक्यातील सुपर वारियर्स यांच्या साठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या सुपर वारियर्स च्या बैठकीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त संख्येने सुपर वारियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचे ही कौतुक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले.
संगमनेर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाची संस्कृती व कलेचे दर्शन घडावे साठी आदिवासी कांबड नृत्याचे आयोजन केले होते. नृत्याने संगमनेर करांचे लक्ष वेधून घेतले. प्रदेशध्यक्ष बावनकुळे यांनी या नृत्यात सामील झाले. यात ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.
भाजपा सुपर वारीयरर्स च्या बैठकीत माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्याची छाप दिसून आली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, तालुका सरचिटणीस राहुल देशमूख, सचिन जोशी, मच्छिन्द्र मंडलिक, अशोक आवारी, भाऊसाहेब वाकचौरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या बैठकीसाठी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी,जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिर्डी लोकसभा संयोजक राजेंद्र गोंदकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे, शिवाजी राजे धुमाळ, गिरजाजी जाधव, माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमूख,खजिनदार धंनजय संत,अमृतसागर दूध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, रमेश राक्षे, अमृतसागर दूध संघांचे संचालक आनंदराव वाकचौरे, अप्पासाहेब आवारी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीपराव शेटे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक बाळासाहेब सावंत, खवीस चे संचालक भाऊसाहेब कासार,राहुल बेनके, सोमनाथ मेंगाळ, नरेंद्र नवले, प्रकाश पाचपुते, वाल्मिक देशमुख, शिवाजी गायकर, मदन आंबरे,भाऊमामा खरात, साहेबराव दातखिळे, प्रकाश नवले, सी. बी. भांगरे,, गंगाराम धिंदळे, भरत घाणे, शैलेश फटांगरे, नामदेव गायकवाड, विजय भांगरे, चंद्रकांत गोंदके,सयाजी अस्वले,सुनील सरोक्ते, उप नगराध्यक्ष शरद नवले, बादशहा एखंडे, कैलास जाधव, अरुण शेळके, केशव बोडके,अगस्ती चे माजी संचालक भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र डावरे, दिनेश शहा, अनिल डोळस, भाऊसाहेब शेटे, दगडू हासे, अशोक देशमूख, राधाकिसन पोखरकर, तुकाराम खाडे, पांडुरंग खाडे,सोमनाथ वाळेकर,नगरसेवक विजय पवार, सागर चौधरी,सोमदास पवार, अमोल वैद्य, बबलू धुमाळ,सुनील कोटकर, बाबासाहेब उगले, अशोक उगले,संजय लोखंडे, गणेश पोखरकर, रावसाहेब शेळके, शिवाजी आरज,काळू भांगरे, रेश्मा गोडसे, माधवी जगधने, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे,तुषार बोऱ्हाडे, निलेश साकुरे, आदिसह अनेक सुपर वारियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते.