डॉ.वाळीबा पोपेरे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान.

अकोले/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील पोपेरेवाडी गावचे सुपुत्र वाळीबा विठ्ठल पोपेरे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
आदिवासी समाजामध्ये वाळीबा पोपेरे हे गेली 17 ते 18 वर्षापासून प्रमाणिकपणे सामाजिक काम करण्याचे उपक्रम राबवत आहे.सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे, अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर राबवणे, जनजागृती अभियान शिबिर राबविणे, ग्रामीण आदिवासी भागामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत गळतीचे प्रमाण थांबवणे, राज्य शासन व केंद्र शासनाचे विविध उपक्रम आदिवासी समाजासाठी राबवणे, ग्रामीण आदिवासी भागामध्ये एसटी महामंडळाचे बस सेवा सुरू करणे, आदिवासी समाजामधील थोर समाजसुधारक व क्रांतिवीर यांचे जयंती पुण्यतिथी साजरी करणे, आदिवासी समाजामध्ये शिक्षणाबाबतचे महत्त्व पटवून देणे संदर्भात कार्यक्रम राबविणे, होतकरू व हुशार नवतरुण-तरुणींना व्यवसाय कामी प्रशिक्षणाचे आयोजन करणे, अशाप्रकारे विविध उपक्रम राबवलेले आहेत.
आदिवासी खेडे-पाडे, वाड्या वस्त्यांवर शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे व ते उपक्रम राबवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे व ते उपक्रम राबवण्यासाठी त्या नागरिकांना प्रोत्साहन करणे ग्रामीण आदिवासी भागातील आदिवासी गरोदर महिलांना आरोग्य विभागाच्या योजना समजून सांगणे असे विविध उपक्रम आदिवासी ग्रामीण भागामध्ये राबवण्यात आलेलेे आहेत. ग्रामीण आदिवासी खेड्यापाड्यावर ग्रामीण आदिवासी वाड्या वसत्यावरील महिलांना रोजगार म्हणून ब्युटी पार्लर कोर्स राबवणे,मेणबत्ती उद्योग माहिती देणे,सुशिक्षित तरुणांसाठी डीटीपी कोर्स मोफत राबवणे,आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अशा विविध प्रकारचे उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आलेले आहे .
तसेच वेळप्रसंगी अगदी ग्रामपंचायत पासून थेट मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विकासात्मक योजनांचा पाठपुरावा करून त्या गावखेड्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे आणण्याचे काम डॉ.व्ही.व्ही. पोपेरे यांनी केले
यानिमित्त कालिदास नाट्यगृह नाशिक येथे ना.विजयकुमार गावित यांच्या हस्ते डॉ.वाळीबा विठ्ठल पोपेरे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदिवासी सेवक हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अरुणा वाळीबा पोपेरे, सिकंदर पोपेरे, ज्ञानेश्वर लेंडे, गौतम साबळे, तुकाराम पोपेरे, गणेश शंकर पोपेरे, नामदेव भिवा पोपेरे, सुनील पोपेरे,पंढरी तातळे, शंकर भांगरे, उमेश कुलाळ, नितीन सदगीर, पोपट सदगिर आदी उपस्थित होते.