राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी घेतले शनीदर्शन!

नेवासा- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे भेट देत शनीदर्शन घेतले.
सकाळी साडे अकरा वाजता झापवाडी शिवारातील हॅलीपॅडवर त्यांचे आगमन झाले. उपस्थित राज्यपाल रमेश
बैसजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर खाजगी वाहनाने त्यांचा ताफा शनी
शिंगणापूर येथे आला. महंत उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक केला. नंतर चौथऱ्यावर जाऊन तेल वाहत शनी
दर्शन घेतले.

शनी दर्शनाने मनाला अगदी प्रसन्न वाटले. येथील परिसर बघून मी भारावून गेले. पुन्हा कधी या भागात येण्याचा योग आला तर मी परत शनी दर्शनासाठी नक्की येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, मंत्री दादा भुसे, राज्य पाल, रमेश बैसजी, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, नितीन शेटे, पोपटराव शेटे, सयाराम बानकर, उपस्थित होते.