आ. लंके व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केला रामदास फुले यांच्या सामाजिक कार्याचा व नियुक्तीचा सन्मान

.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या सामाजिक कार्य व त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी त्यांचा सन्मान करून गौरव केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, मा.उपसरपंच शिवाजी होळकर, शिवा कराळे, नेप्तीचे सरपंच संजय जपकर, जालिंदर शिंदे, उद्योजक अजय लामखडे, हिवरे जरेचे सरपंच भाऊसाहेब काळे, समता परिषदचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे महेंद्र चौगुले, भानुदास फुले, कुमार होळकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संभाजी गडाख, नितीन कदम, नितीन पुंड, बाळनाथ पुंड आदीसह आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देणारे रामदास फुले यांचे कार्य कौतुकास्पद आहे. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे राबवून गोरगरिबांची सेवा केली. फुले यांचा आम्हा सर्वांना अभिमान अभिमान आहे .त्यांचे समाजकार्य युवकांना दिशा देणारे आहे . समाजासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून फुले यांचे कार्य मोठे आहे. सामाजिक संवेदना जागरूक ठेवून फुले यांचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सकल ओबीसी व्हिजेएनटी समाजाच्या वतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते देखील रामदास फुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
