अकोल्यात स्वर्गीय अॅड.कॉ.शांताराम वाळुंज स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन.

अकोले/प्रतिनिधी–
माय मराठी अध्यापक संघ,अकोले आयोजित स्वर्गीय अॅड.कॉ. शांताराम वाळुंज स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मंगळवार दिनांक १२/१२/२०२३ रोजी अगस्ति विद्यालय अकोले येथे आयोजित केलेली आहे.
विदयार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावून जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक व बौद्धिक दृष्टिकोन विकसित व्हावा.त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय अॅड.कॉ. शांताराम वाळुंज स्मृती तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धांत गट क्र.१ मध्ये
इ.१ली ते ४थी साठी – –माझी आजी,माझ्या स्वप्नातील गाव,जीवनातील खेळाचे महत्त्व हे विषय असून पारितोषिक प्रथम १००१रू,द्वितीय ७०१रु,तृतीय ५०१रु.ट्रॉफी व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ ३०१रू. व प्रमाणपत्र,गट
क्र.२ मध्ये इ.५वी ते ७वी साठी – वृक्ष संवर्धन करू या,आदर्श राजा छ्त्रपती शिवाजी महाराज,मोबाईलचा वापर तारक की मारक हे विषय असून पारितोषिक प्रथम १२०१रू, द्वितीय १००१रू,तृतीय ७०१रू ट्रॉफी व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ ५०१रू प्रमाणपत्र,
गट क्र.३मध्ये इ.८वी ते १०वी साठी- महाराष्ट्र संतांची भूमी, वृक्षसंवर्धन काळाची गरज,भारतीय संविधान व आजचे राजकारण हे विषय असून पारितोषिक प्रथम १५०१रू,द्वितीय १००१रू,तृतीय ७०१रू ट्रॉफी व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ ५०१रू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.तरी तालुक्यातील आपल्या विद्यालयाने या वक्तृत्व स्पर्धांत सहभागी होऊन सहकार्य करावे.
यानिमित्ताने अकोले माय मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पवार,दीपक पाचपुते,राजेंद्र भोर,उपाध्यक्ष प्रा. संतराम बारवकर,प्रा.डॉ.रंजना कदम, मंगल सरोदे,सचिव सुनिल साठे,सहसचिव रूपेश गायकर,गंगाधर भांगरे,खजिनदार डी.एन.टकले,स्पर्धा संयोजक प्राचार्य बी.के.बनकर,सचिन वाळुंज सर्व पदाधिकारी,कार्यकारीणी सदस्य आदींनी सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.