निळवंडे डावा कालवा फोडण्याच्या इशाऱ्यावरून अकोल्यात या ठिकाणी जमाव बंदीचा आदेश

अकोले प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या नेत्या अगस्ती साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे डावा कालवा फोडण्याचा इशारा दिल्यानंतर संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी निळवंडे ते कुंभेफळ दरम्यान जमावबंदी आदेश लागू केला आहे
निळवंडे डाव्या कालव्यालगत पाणी पाझरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्याने श्रीमती सुनिताताई भांगरे यांचे नेतृत्वात डावा कालवा खानापुरला फोडणार असा इशारा दिला आहे यामुळे धरणापासुन ते कुंभेफळ या दरम्यान डाव्या कालव्याच्या दोन्ही काठावरील बाजुस फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणेत आले आहे
निळवंडे कालव्यातुन सुरु असलेले आवर्तनामुळे कालव्या लगत असणा-या निळवंडे, कळस या गावातील शेतक-यांच्या जमीनीत कालव्याचा पाझर अतिप्रमाणात असल्यामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे निळवंडे डावा
कालव्याचे पाणी त्वरीत बंद करावे अन्यथा धरणाचा डावा कॅनॉल हा खानापुर गावाजवळ लोकांच्या मदतीने दिनांक १९/१२/२०२३ रोजी फोडण्याचा इशारा दिला आहे. सदर परिसरातील शेतकरी व
नागरीक सदर आंदोलनात सामील होवुन कालवा फोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे व शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे
अकोले तालुक्यातील निळवंडे धरण पाणी सोडण्याचे ठिकाणापासुन ते कुंभेफळ गांव हद्दीत असे निळवंडे धरण डाव्या कालव्याचे दोन्ही काठावरील बाजुस अंदाजे १ किमी. परिसरात दमदाटी मारहाण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नमुद ठिकाणांवर दिनांक १८/१२/२०२३ ते ३१/१२ / २०२३ या कालावधी करीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे केले आहे
सदर नमुद ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई केली आहे.नमुद ठिकाणाचे परिसरात प्रवाह कालावधीत ५ किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास
मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळत इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर / फिरण्याववर कालावधीत निर्बंध राहील असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे
ܟܠ
●●●
: