मुंबईतील महिला पर्यटकाचा सांदण दरीत दुर्दैवी मृत्यू

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या जग प्रसिद्ध सांदनदरीमध्ये एका महिला पर्यटकाचा पाय घसरुन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली .
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणदऱ्या प्रसिद्ध सांदण दरीमध्ये सकाळी अकरा वाजल्याच्या ही घटना घडली या पर्यटक तरुणीचा पाय घसरुन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली
मुंबईतील दहीसर येथील ऐश्वर्या चारुदत्त खाणविलकर ( वय २९ ) ही आपल्या मैत्रीणीसह भंडारदरा पाणलोटात निसर्ग पर्यटनासाठी आली होती . सांदण दरी येथे पर्यटनाचा आनंद घेत असताना एका मोठ्या खडकावरुन तोल गेला आणि दहा ते पंधरा फुट खोल दरीत कोसळली . सदर तरुणीचे डोके दगडावर आपटल्याने तिचा जागीच मृत्यु झाला . घटनेची माहीती राजुर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रविण दातरे व वन्यजीव विभागाचे अमोल आडे आपल्या फौजफाट्यासह तात्काळ हजर झाले .स्थानिक तरुणांच्या मदतीने राजुर पोलिस व वनविभागाने सदर तरुणीचा मृतदेह दरीतुन वर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी राजुर ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला
. राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ. दिलीप डगळे व अशोक काळे हे पुढील तपास करत आहेत
. पर्यटकांनी भंडारदरा पर्यटनाचा आनंद घेताना एकटे फिरु नये .वाटाड्या घेऊनच पर्यटन करावे . स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी पर्यटकांना केले आहे
.भविष्यात अशा पुन्हा दर्घटना घडु नये म्हणुन वनविभागाने धोक्याच्या ठिकाणी तातडीने लोखंडी रेलिंग करण्यात यावी
दिलीप भांगरे
( माजी .पंचायत समिती सदस्य ,अकोले )