माका येथील मंकादेवी यात्रा उत्सवाची जय्यत तयारी

दत्तात्रय शिंदे_
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत तसेच परिसरातील आराध्य दैवत मंकावती देवी मातेच्या यात्रा उत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे
,सालाबादप्रमाणे मराठी महीन्याच्या पुष्प पौर्णिमेला ठरल्या तिथीप्रमाणे, दि. 25 व 26 जानेवारीला ग्रामस्थ व मंकावती माता देवी ट्रष्ट कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
माका गावाचे नाव देवी मंकावतीच्या नावावरुनच पडले असुन,प्रभुरामचंद्रांनी याच ठिकाणी राक्षस अहीराव व महीरावाचा वध केल्याची मोठी आख्यायिका आहे.
यामुळे यादेवीच्या यात्रा उत्सवाची परंपरा फार जुनी आहे
याप्रसंगी पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता कावड पाणी मिरवणूक व रात्री 8 वाजता छबीना, शोभेची दारु व त्यानंतर 9:30ला लोकनाट्य तमाशा कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 10 वाजता जिल्ह्यातील तसेच
जिल्ह्याबाहेरून आलेल्या नामवंत कलावंता ची हजेरी
कार्यक्रम व दुपारी 3 ते 6 वेळेत मल्लांच्या कुस्तीचा जंगी हगामा होणार असल्यामुळे यात्राउत्सवाचा सर्व भावीक भक्तांनी लाभ घेण्याबाबतचे आवाहन ग्रामस्थ व मंकावतीमाता देवी ट्रष्ट कमीटीच्या वतीने केले आहे.