शिर्डी येथे माध्यम संवाद परिषदेचे आयोजन

अहमदनगर- विश्व संवाद केंद्र, पुणे आणि ग्रिन ॲण्ड क्लिन शिर्डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम संवाद परिषद् चे आयोजन शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे
प्रसार माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ ! वर्तमानपत्रापासुन सुरु झालेला माध्यमांचा हा प्रवास आज इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मिडीया अशा विविध प्रकारांमध्ये विस्तारीत झाला आहे. या सोबतच
सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही आज अनेकजण आपले विचार मांडतात. समाजाच्या वैचारीक जडणघडणीत ही सर्व प्रसार माध्यमे तसेच कला व साहित्य प्रकार हे महत्वपूर्ण भूमिका बजावतांना
दिसतात. उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व माध्यमकर्मीचा परस्पर परिचय, संवाद होऊन, अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, सकारात्मकता वाढावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत हा या परिषदेतील संवादाचा विषय आहे श्री. काशीनाथ देवधर (गन एक्स्पर्ट आणि निवृत्त वरीष्ठ शास्त्रज्ञ, डि.आर.डि.ओ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २८ जानेवारी २०२४ दुपारी ३ ते ६ वाजता हॉटेल साईछत्र कॉन्फरन्स हॉल शिर्डी बस स्टॅण्ड समोर, नगर मनमाड रोड शिर्डी, ता. राहाता, जि.अ.नगर येथे या माध्यम संवाद परिषदेचे आयोजन केलेआहे
माध्यम कर्मींनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. अभय कुलकर्णी (अध्यक्ष, विश्व संवाद केंद्र, पुणे)
श्री. अजित पारख (अध्यक्ष ग्रिन अॅण्ड क्लिन शिर्डी फाउंडेशन)
अॅड. श्री. अनिल शेजवळ (कार्याध्यक्ष शिर्डी परिक्रमा) यांनी केले आहे