पक्षीय झेंडे बाजूला ठेऊन ओबीसींच्या हक्कासाठी एकत्र यावे – मिनानाथ पांडे.
अकोले प्रतिनिधी
ओबीसीना घटनेने हकाचे आरक्षण दिले मात्र ते आरक्षण हिसकावण्याचे काम सध्या सुरू आहे यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी व ओबीसी समाँजाचे उन्नती साठी पक्षीय झेंडे बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी केले
अहमदनगर येथे 3 फेब्रुवारी रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ओबीसींच्या एलगार मेळाव्याच्या निमित्ताने कोतूळ (तालुका अकोले) येथे आयोजित ओबीसी समाजाच्या बैठकीत ते बोलत होते बैठीकच्या अध्यक्षस्थानी कोतुळ चे माजी सरपंच रमेश भुजबळ हे होते
यावेळी बोलताना पांडे म्हणाले की राजकारणात समाजकारणात आम्ही अनेक वर्षे काम केले आम्हाला आता कशाची अपेक्षा नाही यापुढे आता ओबीसी या पिछाडलेल्या वर्गासाठी काम करू ज्यांना भरपूर आहे तेच ओबीसी च्या ताटातील हिसकावत असल्याचं ते म्हणाले मनोज जरांगेनच्या आंदोलना बाबत बोलताना ते म्हणाले की त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे हा कटपुतली चा खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला
यावेळी बैठकीतअहमदनगर येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यासाठी एक हजार पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्ते नी जाण्याचे नियोजन करण्यात आले
या प्रसंगी अकोले नगर नगरपंचायत चे नगरसेवक प्रमोद मंडलिक प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे , गणेश ताजने, पत्रकार श्रीनिवास रेणुकादास पतसंस्थेचे संचालक वसंतराव बाळसराफ, अशोक शिंदे
चंद्रकांत घाटकर,ईश्वर महाराज कुंभार भास्कर कोते सुमंता गिते, गणेश सोनूले,सचिन गिते ,प्रकाश वाकचौरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी आदिवासी सेवक पुरस्कार सन्मानित भाऊसाहेब मंडलिक,अगस्तीचे संचालक बाळासाहेब ताजने, रामनाथ शिंदे अकोले नगरपंचायत चे नगरसेवक नवनाथ गायकवाड शिवाजी गायकवाड किशोर झोडगे सचिन रासकर अनिल नाईकवाडी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक, व्हा चेअरमन संजय गिते, रंगनाथ मंडलिक, राजेंद्र उकिरडे, सन्तु मंडलिक ,सुरेश शिंदे नवनाथ पांडे अनिकेत भालेराव,संतोष काळे , दीपक राऊत ,योगेश बोऱ्हाडे, विजय नेवासकर, बाबासाहेब क्षीरसागर ,नंदू गिते ,सचिन फुलसुंदर, राहुल वाकचौरे ,दीपक बोऱ्हाडे ,रमेश बोऱ्हाडे बाळासाहेब सोनूले ,शंकर बेळे,भास्कर गिते शांताराम गिते, भाऊसाहेब गिते, सुरेश गिते आदी सह महिला बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते
सुनील गिते यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर माजी सरपंच रमेश भुजबळ यांनी आभार मानले