इतर

ओबीसी एल्गार मेळावा निमित्ताने नेप्तीत पूर्वनियोजन बैठक संपन्न…

भुजबळांच्या मागे ओबीसी पुर्ण ताकदीने :नागेश गवळी


अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरात ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा पूर्वनियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल माळी समाजाच्या वतीने करण्यात आले होते . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे संघटक रवी भाऊ सोनवणे होते

.यावेळी ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माहिती पत्रकाचे वाटप ग्रामस्थांमध्ये करण्यात आले .बाहेर गावावरून मेळावासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता, पाणी विविध विषयांवर व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले . सभास्थळी स्वयंसेवक म्हणून अनेकांनी जबाबदारी घेतली आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे घरचे कार्य समजून मेळावा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

शनिवार दिनांक 3 फेब्रुवारीला नेप्ती गावातून समता परिषद व सकल ओबीसी समाज यांच्या वतीने भव्य बाईक रॅली काढून मेळाव्याला जाणार असल्याचे रामदास फुले यांनी सांगितले .ओबीसींच्या एल्गार मेळाव्यास दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी राहणार आहे.

नगर शहरात शनिवारी ३ रोजी क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी दूपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन आहेत. तर प्रमुख उपस्थितीत आ. गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे, माजी आमदार नारायण मुंडे यांसह विविध नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना बरोबर घेऊन आपल्या हक्काचा लढा यशस्वी करायचा आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना याधीही मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आजही ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ते लढत आहेत .ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी मंत्री छगन भुजबळ यांना मोठी साथ देऊन त्यांच्या मागे मोठ्या ताकतीने उभे राहावे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पवक्ते नागेश गवळी यांनी केले.

यावेळी समता परिषदेचे संघटक रवी भाऊ सोनवणे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले,माजी सरपंच अंबादास पुंड, अमर वझरे ,माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, शाखाध्यक्ष शाहूराजे होले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड प्रा.भाऊसाहेब पुंड प्रा.एकनाथ होले भानुदास फुले, दादाभाऊ फुले, सौरभ भुजबळ ,सार्थक होले ,संभाजी होले ,नितीन शिंदे ,संतोष बेल्हेकर, नानासाहेब बेल्हेकर ,विजय बेल्हेकर, बाळासाहेब बेल्हेकर, उत्तम फुले, गणेश फुले, तेजस नेमाने कुणाल शिंदे ,दत्ता कळमकर गोरख बेल्हेकर ,जालिंदर बेल्हेकर, किरण पुंड, अमोल पुंड, नितीन पुंड, मिलिंद फुले ,संतोष लोंढे ,वैभव पुंड, सुभाष लोंढे, महादेव पुंड ,निलेश पुंड ,सचिन पुंड, रवी पुंड ,बालनाथ पुंड, दिनेश भोळकर ,राजू शिंदे, प्रमोद जाधव ,तुषार पुंड ,जालिंदर पुंड, शिवाजी कळमकर, ओंकार बेल्हेकर, गोरख शिंदे, रावसाहेब कर्पे परिसरातील ग्रामस्थ व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button