
नेवासा प्रतिनिधी
सोनई पोलीस स्टेशन ला गुन्हा रजिस्टर क्रमांक397/21 भा. द.वी कलम 392 या दाखल गुन्ह्यांमधील फिर्यादी . ओमकार अण्णासाहेब म्हस्के राहणार गोंदी तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे तक्रारवरून अज्ञात आरोपी याने चांदा शिवारातून स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर चोरी करून पळून घेऊन गेले होते
सदर आरोपी याचे शोध चालू असताना डम डेटा आधारे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील दोन मोबाईल क्रमांक संशयित काढण्यात आले त्यावरून आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यांमध्ये. आरोपी नामे अक्षय रामा साळवे राहणार पंचशील नगर अहमदनगर यास अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे सदर गुन्हा त्याने शिवम गरड माऊली रसाळ राहणार शेकटे तालुका शेवगाव सह इतर साथीदार यांच्या मदतीने केलेला आहे सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले ट्रॅक्टर किंमत 750,000 हे हस्तगत करण्यात आलेले आहे
सदर चांगली कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील , मा. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर सो उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे सपोनि सचिन बागुल यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे.पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे यांनी केली आहे
. सदर गुन्ह्याचा पुढील तपास विक्रम मिसाळ पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.